Home / Virus - Pune S01E05
नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मनात राहून राहून प्रश्न येतोय. त्या माणसाला गोळी कुणी घातली असेल आणि का?