Home / Virus - Pune S01E07
नेहा, मायरा आणि दिव्याला अचानक सचिन येऊन मिळाल्यानं त्यांची ताकद वाढलीय. पण दुसरीकडे जगण्याच्या लढाईतली संकटंही प्रत्येक क्षणागणीक वाढताहेत. शहरात लोकांना थेट गोळ्या घालण्यात येत असल्यानं त्यांना काही करून पुण्याबाहेर पडायचंय. पण पुण्याबाहेर पडायचे सगळे रस्ते बंद केले असल्यानं ते कसेतरी एका सुपरमार्केटपाशी पोचलेत. पण तिथे एक ट्रॅप आहे, जो मायराच्या जीवावर बेतलाय. छोटी मायरा त्यातून वाचेल?