Home / Virus - Pune S01E10
मायरा आणि सचिन फर्निचर मॉलमध्ये एकटेच असताना एक माणूस अचानक खिडकीची काच फोडून आत शिरतो. मायरा-सचिन त्या माणसाच्या तावडीतून सुटतील? इकडे तो दिव्याच्या जीवावर उठलेला बंदूकधारी आता दिव्या आणि नेहाच्या कैदेत आहे. पण काहीतरी अघटीत घडणारे अशी शंका त्यांना येतीय. दिव्या त्या बंदूकधाऱ्याकडून माहिती काढून घेत असतानाच मायराचा किडनॅपर तिला घेऊन तिथं येतो. त्याच्या तावडीतून मायराला सोडवण्यापूर्वीच मगाचचा मिलिट्रीचा ट्रक परत येतो. त्या मिलिट्रीच्या लोकांना लहानग्या मायरामध्ये इंटरेस्ट आहे. मायराच्या केसालाही धक्का लागू नाही म्हणून नेहा आणि दिव्याही जंगजंग पछाडताहेत. त्या मायराला वाचवू शकतील? हा जीवघेणा खेळ खरंच संपेल?