Home / Sanyashyasarkha Vichar Kara
संन्यासासारखा विचार करा या पुस्तकात जय शेट्टी आपल्याला दैनंदिन जीवनात येणारे मानसिक अडथळे दूर करून मनाचे सामर्थ्य कसे वाढवायचे आणि मनःशांती च्या मार्गाने कार्यक्षमता कशी विकसित करायची याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. ज्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतो त्याचप्रमाणे मनःशांतीच्या क्षेत्रात संन्याशांचे मार्गदर्शन घ्यावे कारण त्यातील तज्ञता अनुभवतून आलेली असते. स्वतः जय शेट्टी यांनी वैदीक परंपरेतील एक संन्यासी या नात्याने घालवलेला काळ यात चित्रित केलेला आहे आणि कसा विचार करावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे.